स्वतंत्र दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी समाजसेवक अमोल केंद्रे यांचे अमरण उपोषण, आजचा सहावा दिवस

Share news

ठाणे : विनोद वास्कर

दि. २१, दिवा (ठाणे) : दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी दिवा रेल्वे स्टेशन जवळ समाजसेवक अमोल धनराज क्रेद्रे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल रेल्वे चालू करण्याची मागणी. आजचा ६ वा दिवश रेल्वे आधिकारी यांनी भेट घेतली. नेहमी प्रमाणे तेच उत्तर, प्रवासी यांच्या अपघात होत आहेत, तरी देखील दुर्लक्ष रेल्वे व्यवस्थापक करीत आहे.

जिव गेला तरी चालेल आमरण उपोषण मागे घेणार नाही. लाखो च्या संख्येने प्रवासी प्रवास करत आहेत.दिव्यातील अनेक संघटना, मंडळ, प्रतिष्ठान, फौंडेशन, सामान्य नागरिकांनी पाठिंबा सुद्धा दिला आहे. तीन वेळा डॉ.श्रीकांत शिंदे खासदार होऊन सुद्धा दिव्यासाठी स्वतंत्र दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे चालू करू शकले नाही. त्यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे. प्रशासन, मंत्री, यांना सुद्धा निवेदन दिले आहे तरीसुद्धा दखल अजून पर्यंत घेण्यात आली नाही. दिव्यांच्या प्रवाशांच्या मृत्यू झाला तरी चालेल का? अजून किती बळी घेणार, प्रशासन, कधी जागे होणार!, दिव्यातील सर्व नागरिक या आमरण उपोषणाला पाठिंबा देत आहे.

Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247