दिवा मनसेच्या यशस्वी मध्यस्थी नंतर RTE प्रवेश प्रक्रिया निश्चिती झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार उद्यापासून प्रवेश; शाळा व्यवस्थापनांची सामंजस्याची भूमिका..

Share news

ठाणे : विनोद वास्कर

दि. दिवा (ठाणे): दिवा शहरातील RTE प्रवेश प्रक्रिया निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना काही शाळांकडून मुदत उलटून गेल्यानंतरही प्रवेश देण्यात आले नव्हते. याबाबत दिवा मनसेने शिक्षण विभागाकडे आवाज उठवला होता. त्यानंतर आज मेस्टा संघटनेचे अध्यक्ष नरेश पवार यांच्या सोबत दिवा मनसे पदाधिकारी आणि पालकांची संयुक्त बैठक घेण्यात आली.

शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेवून त्यांना त्वरित प्रवेश द्यावा अशी मागणी शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी केली. शाळांच्या शासनाकडून असलेल्या त्यांच्या न्याय मागण्यांबाबतच्या शाळांच्या लढ्यात दिवा मनसे नेहमी त्यांच्या सोबत उभी राहील, पण यात विद्यार्थ्यांचे नुकसान नको अशी भूमिका तुषार पाटील यांनी मांडली.

शाळा व्यवस्थापनांनीही याबाबत सहकार्याची भूमिका घेत उद्या पासून RTE च्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले. शाळांनी घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत केले असून पालकांनीही याबाबत आनंद व्यक्त केला.

यावेळी मनसे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे, मनविसे शहर अध्यक्ष कुशाल पाटील, शाखाध्यक्ष सागर निकम आणि पालकवर्ग बैठकीसाठी उपस्थित होते.