१४ गावातील विकासकामात संदर्भात आमदार राजू पाटील यांनी नवी मुंबईतील आयुक्त कैलास शिंदे यांना भेटून केली चर्चा.

Share news

ठाणे : विनोद वास्कर

दि. २१, कल्याण (ठाणे) : आमदार राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात असलेल्या १४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश झाला आहे. आमदार राजू पाटील यांनी नवी मुंबईतील मनपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्यासोबत १४ गावांच्या विकासकामांसंदर्भात प्रामुख्याने चर्चा केली आहे. यावेळी आयुक्तांनी १४ गावांसाठी तातडीने पाच आरोग्य केंद्र “आपला दवाखाना” तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिल आहे. तर महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, मालमत्ता हस्तांतरण,१४ गावांसाठी बस सेवा, नावाळी येथील बाल माता आरोग्य केंद्र सुरू करणे, १४ गावातील ग्रामपंचायत कर्मचारी,शाळेतील शिक्षक आदी विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.

यावेळी आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच त्याच प्रत्यय देखील १४ गावात दिसून येणार आहे.यावेळी नवी मुंबई मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, अग्निशमन दलाचे अधिकारी पुरुषोत्तम जाधव, भागवत डोईफोडे उपायुक्त,प्रवीण गाडे कार्यकारी अभियंता, मदन वाघचौरे यांसह सर्व १४ गाव विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.