रॅगिंग प्रतिबंधक कायद्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या तरतुदी – ॲड आळंदीकर..

Share news

संपत बनकर सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) :- रॅगिंग प्रतिबंधक कायद्यात महाविद्यालय व व विद्यापीठाद्वारे शिक्षा केल्या जात असतात.त्याचबरोबर फौजदारी गुन्हे देखील दाखल करण्याची तरतूद असून विद्यार्थ्यांना दोन्ही शिक्षेला सामोरे जावू लागते

अशी माहिती ज्येष्ठ विधीज्ञ ऍड आळंदीकर यानी सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात दिली. रॅगिंग प्रतिबंधक कायद्यावर ते मार्गदर्शन करीत होते.

सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस बी सूर्यवंशी यांचे अध्यक्षतेखाली रॅगिंग प्रतिबंधक दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आळंदीकर बोलत होते.

ते पुढे म्हणाले की रॅगिंग प्रतिबंधक कायद्यामध्ये पीडित विद्यार्थ्यांना मोठे संरक्षण देण्यात आले आहे . जर कोणी वरिष्ठ विद्यार्थी कनिष्ठ विद्यार्थ्यांना त्रास देत असेल, त्यांना कोणत्याही प्रकारे चिडवत असेल, त्यांना चुकीचे मेसेज पाठवत असेल, त्यांचे चोरून फोटो काढत असेल, त्यांचा पाठलाग करत असेल, एखादी चुकीची गोष्ट करण्यास प्रवृत्त करत असेल तर विद्यार्थी आपले नाव गुपीत ठेवून रॅगिंग कमिटी कडे तक्रार करू शकतो.त्या एका मुलावर किंवा गर्दीत तो मुलगा सापडला नाही तर सर्व मुलांच्या टोळी वर या कायद्याद्वारे फौजदारी गुन्हा दाखल होवू शकतो तसेच मुलाना परीक्षेला न बसू देण्यापासून ते विद्यापीठातून काढून टाकण्यापर्यंत ,पन्नास हजार रुपये दंडापर्यंत शिक्षा होवू शकते. महाविद्यालयाच्या परिसरात व बाहेर देखील त्या कायद्याने विद्यार्थ्यांना संरक्षण दिले आहे. गुन्हा न केल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी देखील पिडीता वर नसून ती संशयीत आरोपीवर आहे अशा कडक तरतुदी असल्याचे ते म्हणाले.

प्रस्ताविकामध्ये प्राचार्य डॉक्टर एस बी सूर्यवंशी यांनी रॅगिंग प्रतिबंधक दिवस साजरा करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये या कायद्याची जागरूकता निर्माण करणे हा असल्याचे सांगितले.

यावेळी प्राध्यापक एस बी पिंगळे यानी स्वागत केले तर सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रिया राऊत यानी केले व आभार प्राध्यापिका प्रतीक्षा जगताप यांनी मानले .सोमेश्वर शिक्षणं संस्थेचे व सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप ,उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे,संचालक आनंदकुमार होळकर ई नी रॅगिंग प्रतिबंधक उपाययोजना बद्दल शिक्षक वर्ग व रॅगिंग कमिटी चे अभिनंदन केले .

Local News 247