युवांना कवितेतून जगण्याचा मार्ग युवकांच जगन..

Share news

प्रतिनिधी :- दिलीप निकम तळा

 

स्वप्नांचा हा उभा झरा

युवकांच्या मनाचा हुंकार खरा…

नव्या आशा, नव्या इच्छा,

नव्या वाटांचा शोध नवा…

 

संकटं येतात, धैर्य वाढतं

थांबायचं नाही आता पावलं पुढे टाकत रहायचं…

युवकांची ताकद आहे ही निर्धाराची,

कसोटीच्या वेळी जागं राहायची…

 

मागे फिरायचं नाही, आता फक्त समोरंच बघायचं

जग जिंकण्याचा दृढ निश्चय करायचं…

युवक आहेत स्वप्नांचे शिल्पकार

त्यांच्या ध्येयात भरलेलं आहे जीवनाचं सार…

 

अडचणींना तोंड देत, ते उंच जातात

युग बदलणारे हे खरे काळाचे रक्षक बनतात…

युवकांचं जगणं म्हणजे जिद्दीची ओळख,

त्यांच्या प्रत्येक पावलांनी बदलते जगाची ओळख, जगाची ओळख…

कवी . कु संकेत दिनेश नाकरेकर