पनवेल (खांदा कॉलनी) येथे समाजसेवक गणेश साबळे यांचा ५० वा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..

Share news

प्रतिनिधी/ संदीप द्रौपदी तुकाराम लाड 

२६ जुलै रोजी पनवेल खांदा कॉलनी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सेक्टर १७ चे शाखाप्रमुख,गवळी समाज संघटना अध्यक्ष, समाजसेवक गणेश साबळे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

त्याची सुरुवात दुपारी बाळग्राम अनाथ आश्रम येथे अन्नदान करून तेथील मुलांसोबत वाढदिवस साजरा केला त्यानंतर

संध्याकाळी जिवलग मित्र,नातेवाईक,हितचिंतक यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी खांदा कॉलनी येथील संस्मरण बँकेट हॉल येथे आयोजित करण्यात आला होता

त्या कार्यक्रमात कुटुंबातील महिलांकडून औक्षण करण्यात आले नंतर केक कापण्यात आला त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गणेश साबळे यांच्या सुवर्ण महोत्सवी संघर्षमय जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले व पुढील भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या

तसेच रात्री स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

या अभिष्टचिंतन सोहळ्याला पनवेल शहरातील नगरसेवक ,विभागप्रमुख, पदाधिकारी, शहरातील व्यावसायिक, पत्रकार, सोसायटी चेअरमन , गवळी समाजातील समाजसेवक सुहास महागावकर, गणेश वाजे भरत रिकामे किशोर लाड अशोक काते नारायण रिकामे रुपेश महाडिक प्रदीप रिकामे सिद्धेश महाडिक सुनील महाडिक,रघुनाथ दिवेकर,अनिल काते,विजय काते, यांच्यासह महिला भगिनी,नवतरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247