जुने १७ मित्र एकत्र येऊन केली पिकनिक मध्ये धमाल, २६ वर्षाची मैत्री अबाधित, ये दोस्ती हम नही तोडेंगे..

Share news

ठाणे : विनोद वास्कर

दि. २६, ठाणे : इंदगाव बदलापूर येथे असलेल्या बांमबुझ फार्म हाऊस यामध्ये आज दि. २६ जुलै २०२४ रोजी आठवीपासून ते दहावीपर्यंत शिक्षण घेत असलेले. आमचे जुने मित्र आम्ही पुन्हा ८ वर्षांनी एकत्र येऊन पिकनिक साजरी केली. या पिकनिक साठी आम्ही १७ जण एकत्र आलो होतो. प्रत्येकी १ हजार रुपये आणि ४,३,१ असे एस्ट्रा योगदान दिले, देणारे. आमचे जिवलग मित्र होते. आमची मैत्रीण १९९८ पासून २०२४ पर्यंत टिकून राहिली आहे.आज या ठिकाणी दिवसभर खूप एन्जॉय केला. जुन्या आठवणी सर्वांना आठवल्या एवढे वर्ष मित्र सांभाळून ठेवणे आणि मैत्री टिकून ठेवणे. आणि प्रत्येकाच्या सुखात दुःखात सहभागी होणे.

या कलियुगात शक्य नाही. पण या सर्व मित्रांनी शक्य करून दाखवले आहे. काहीजण म्हणतात १०० मित्र नको एक मित्र ठेवा. की तो संकटकाळी तुमच्या दुःखात सुखात तुम्हाला मदत करेल. ही आमची १७ जणांची टीम कधीही एकमेकांना मदत करण्यासाठी सतर्क असते. ये दोस्ती हम नही तोडेंगे. या दिवसाची प्रत्येकाला आठवण राहील असा आनंदाचा सण आमचा हा आजचा होता. प्रत्येकाने आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले. असं वाटत होतं की प्रत्येक जण हा आपला शाळेमध्ये भाषण करतो आहे. न बोलणारा गप्प बसणारा आज मित्र त्या ठिकाणी माईक घेऊन बोलत होता. आणि मन आपला हलकं करत होता. मित्रांबरोबर असलेली आपली भावना सर्वांसमोर तो मांडत होता.

प्रत्येक वर्षी अशी पिकनिक व्हायला पाहिजे. अशी प्रत्येकाने आपले मत मांडले आणि पुढचे नियोजन सुद्धा त्यांनी करून ठेवले. कोण कोणाला कधी सोडून जाईल सांगता येत नाही. पण मित्रांसोबत असलेले हे आनंदाचे सण कोणीही विसरू शकत नाही. २६ वर्ष मैत्री टिकून ठेवन. खरंच विश्वासच बसत नाही. आमच्या तीन मित्र या जगातून निघून गेले सुरेंद्र, अमर, आणि श्याम खरतर आज या तिघांचीही आठवण आम्हाला खूप आली. या आठवणीने आम्ही त्यांना आज आमच्या पिकनिक ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

या ठिकाणी असलेल्या स्विमिंग पूल मध्ये १७ जणांनी एकत्र आंघोळ केली. खूप मस्ती या स्विमिंग पूल मध्ये केली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य होते. आनंद हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. असं वाटतं आयुष्यातल्या घालवलेले मागे क्षण हे आपण या पिकनिक मध्ये मिळवलं असं वाटत होतं. वाट सुद्धा नव्हतं की आज आपण त्या शाळेमध्ये शिक्षण घेताना जी दोस्ती होती तीच आपली दोस्ती तीच आहे असं प्रत्येकाला वाटत होतं.

आज आपल्या स्वतःच्या कुटुंबाची ही आठवण प्रत्येक मित्राला आली नाही. कारण मित्र म्हटले की सर्व काही जो मित्र करू शकतो. तो कुटुंबातील सदस्य करू शकत नाही. असं अनेक जणांचे असे मत आहे आणि खरंच ते आज मत खऱ्या अर्थाने सिद्ध झाले. मित्रांनो अशीच आपली दोस्ती यापुढेही टिकून ठेवू