शिवणी पिसा येथील कु . वैष्णवी अशोक बावरे हीची महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड; गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार..

Share news

सिंदखेडराजा मातृतिर्थ / ज्ञानेश्वर तिकटे (केवट)

सिंदखेडराजा मातृतिर्थ / ( लोणार ):- कु. वैष्णवी अशोक बावरे वाशिम जिल्हा महाराष्ट्र पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल तिच्या सत्काराचा भव्य दिव्य कार्यक्रम कार्यक्रम दि.23जुलै रोजी लोणार तालुक्यातील शिवणी पिसा येथे संपन्न झाला

अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वैष्णवी बावरे या मुलीने पोलीस भरतीची तयारी करून पोलीस शिपाई होण्याची स्वप्न पूर्ण केले .

मातंग समाजातील मुलींसाठी एक आदर्श निर्माण केला .

सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सदस्य मा. दिलीप वाघ,सुनिल पाटील वाघ, सरपंच समाधान पिसे पाटील (सरपंच) शिवनी पिसा मा.शेख सर विदर्भ अकॅडमी लोणार, महादेव बावरे सर सक्षम कोचिंग क्लास मेहकर, अशोक बावरे सर माजी शिक्षक जिल्हा परिषद शाळा शिवनी पिसा,मधुकर बावरे अण्णाभाऊ साठे उत्सव समिती अध्यक्ष,उप अध्यक्ष गजानन विठ्ठल बावरे , सचिव सुभाष आवारे, शेषराव बावरे संतोष बावरे गजानन आ. बावरे काशिनाथ बावरे मच्छिंद्र बावरे जालिंदर बावरे प्रकाश आवारे राष्ट्रीय लहू शक्ती लोणार तालुका उपाध्यक्ष भगवान बावरे , जमुना बावरे,अलका बावरे,भारती बावरे,संगीता बावरे,अनुसया बावरे,वंदना बावरे, रुक्मिना बावरे, सविता बावरे,बालू बावरे, संगीता आवारे, व सर्व मातंग समाज तथा गावकरी मंडळी उपस्थित होते.

सदर कुमारी वैष्णवी अशोक बावरे याची पोलीस दलामध्ये निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने तिचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला उघड्यागाडीमध्ये तिची पुष्पवृष्टीच्या वर्षावामध्ये भव्य मिरवणूक करण्यात आली,

सदर कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .