सिंदखेडराजा मतदारसंघात वाढणार बूथची संख्या; तीन मतदान केंद्र विलीन; काही बूथला नवीन नावे

Share news

सिंदखेड राजा मातृतिर्थ/ ज्ञानेश्वर तिकटे (केवट )

सिंदखेडराजा / लोकसभा निवडणुकीत आलेल्या अनुभवाच्या आधारे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत जिल्ह्यातील मतदान केंद्रात वाढ करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी निवडणूक आयोगासमोर ठेवला आहे. त्यानुसार सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील बुथ वाढवण्याचा प्रस्ताव निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे सादर केला केला आहे. त्यामध्ये सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात चार बूथ वाढणार आहेत. त्यामुळे बुथची संख्या ३३६ वरुन ३४० होणार आहे. तर तीन मतदान केंद्रांचे विलीनीकरण होणार असून काही मतदान केंद्राचे नावे देखील बदलणार आहेत.

काही ठिकाणी अधिक मतदान होण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. विशेषतः पारंपरिक ठिकाणीच मतदान

केंद्र निर्माण केले जातात. त्या शाळांही आता जीर्ण होत चालल्या आहेत. पण, केंद्र त्याच ठिकाणी राहिल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढत नसल्याचे दिसून आले. त्यामूळे नवीन इमारती, सोसायट्यांचे हॉल, कार्यालयांमध्ये मतदान केंद्र निर्माण करण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे. त्यानुसार नुकतीच उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी प्रा. संजय खडसे आणि निवडणूक नायब तहसीलदार मनोज सातव यांनी विविध राजकीय पक्षाची पदाधिकाऱ्यांच बैठक घेऊन नविन मतदान केंद्र, विलीनीकरण तसेच मतदान केंद्राच्या इमारतीच्या ठिकाणात व नावात होणाऱ्या बदल करणे आदी बाबत चर्चा करून काही हरकती आहे का?, याबाबत विचारपूस केली. त्यानुसार कोणाचीच कोणतीच हरकत नसल्याने सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात चार नवीन बूथ प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामध्ये जांभोरा येथे एक आणि सिंदखेडराजा शहरात दोन, आणि

पांग्री उगले येथे एक, असे एकूण चार नवीन बूथ वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदारांना मतदान करणे सोपे होणार आहे.

असे राहतील नवीन बूथ मतदान केंद्र क्रमांक १५८ अंभोरा या मतदान केंद्रामध्ये जांभोरा गावातील मतदारांना मतदानाकरीता नदी ओलांडून ८ किमी पेक्षा जास्त अंतर पार करावे लागत होते त्यामुळे नविन जांभोरा मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले. सिंदखेडराजातील १४०० पेक्षा जास्त मतदार झाल्यामुळे मतदान केंद्र क्रमांक २२८ मधुन ३६० व मतदान केंद्र क्रमांक २३३ मधुन ४८४ मतदार काढूण नविन मतदान केंद्र प्रस्तावित केले आहे. सिंदखेड राजातील मतदान केंद्र क्रमांक २३५ मधुन ४२२ व मतदान केंद्र क्रमांक २३६ मधुन ६०५ मतदार काढूण नविन मतदान केंद्र प्रस्तावित केले आहे. पांग्री उगले मतदान केंद्र क्रमांक २२८ मधुन ३६० व मतदान केंद्र क्रमांक २३३ मधुन ४८४ मतदार काढूण

नविन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले. मतदान केंद्र क्रमांक २१६ देऊळगाव राजा या मतदान केंद्रातील भाग २१६ मधुन २४१ मतदार मतदान केंद्र क्रमांक २१४ विलीन करणे. सिंदखेड राजा मतदान केंद्र यादी भाग २३१ मधुन १४२ मतदार मतदान केंद्र क्रमांक २३० मध्ये विलीन करणे. मतदान केंद्र क्रमांक १७२ बारलिंगा या मतदान केंद्रामध्ये बारलिंगा वाघरुळ या दोन गावाचा समाविष्ट आहे. वाघरुळ व बारलिंगा या दोन गावामध्ये ५ ते ७ किमीचा अंतर असल्यामुळे मतदान केंद्र क्रमांक १७२ बारलिंगा या केंद्रामधुन वाघरुळ गावाचे मतदार मतदान केंद्र क्रमांक १४८ वाकद जहागीर या मतदान केंद्रात विलीन करने. मतदान केंद्र क्रमांक १५ रोहडा या मतदान केंद्राची खोली जिर्ण झाल्यामुळे सदरचे मतदान केंद्र बदलने, यासह देऊळगाव राजा शहरातील अनेक मतदार केंद्राचे नाव बदलण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.