सिंदखेडराजा मातृतिर्थ/ ज्ञानेश्वर तिकटे ( केवट )
सिंदखेडराजा :- तालुक्यातील बारलिंगा येथे गोपनीय माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने
दि २५ जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते अतुल दिनकर भुसारी यांच्या घरी तपासणी केली असता त्यांच्याकडे देशी दारू ८ .६४ लिटर दारू जप्त केली आहे अंदाजे साडेतीन हजार रुपये किमतीचा दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली असून कारवाई करता पुढील प्रक्रिया सुरू केली आहे,
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रा . ने . रोकडे , एस . बी . रोटे , ‘दुय्यम निरीक्षक, जी पराडे . स . दुय्यम निरीक्षक, एन . पी . दिवाने , जवान . एस . डी जाधव ,जवान यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे वृत्त लिहीपर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.