घणसोली सिम्प्लेक्स जवळच्या अवैध्य दुकानावर संयुक्त कारवाई संबंधी स्वराज्य संघटनेच रबाळे पोलिस स्टेशन मधे निवेदन.

Share news

स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली तसेच स्वराज्य संघटनेचे मुंबई उपाध्यक्ष अंकुश कदम यांच्या नेतृत्वाखाली व स्वराज्य संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष उमेश जुनघरे याच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष श्री विनायक जाधव यांनी आज रबाळे पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली . घणसोली येथील नवी मुंबई महानगरपालिका व श्रीमति इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या कॉलेज व शाळेच्या आवारात ग्रीन विन्स या नावाचे दारूचे दुकान आहे.यापूर्वी सहायक आयुक्त श्री शकतं खाडे यांना दोन वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.तसे बघण्याचा प्रयत्न केला तर ह्या विन्स ला परवानगी मिळालीच कशी नाहरकत प्रमाणपत्र दिले कसे. नियमानुसार शाळेपासून शंभर मीटरच्या परिसरात दारूचे दुकान नसणे बंधनकारक आहे.

या असलेल्या दारूच्या दुकानामुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे. काही काळापूर्वी एका दारुड्याने एका मुलीची छेड काढली होती. मद्यपी रस्त्यावर दारू पिऊन पडतात. दारुड्यांची मारामारी होते व विद्यार्थी ते पाहत राहतात. विद्यार्थ्यांवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे हे दुकान तातडीने स्थलांतरित करण्यात यावे ही मागणी करण्यात आली.
यावेळी उपस्थित नवी मुंबई शहर अध्यक्ष विनायक जाधव तसेच पदाधिकारी आशिष मोरे, संकेत निवडुंगे , राहुल शिंदे , ऋषिकेश शेलार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment