कोंकणरेल्वेच्या प्रवाशांच्या समस्या तसेच प्रलंबित मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी घेतली रेल्वे मंत्र्यांची भेट.

Share news

सध्या चर्चेत असलेला गणपती तिकिट बुकिंगचा मुद्दा तसेच इतर समस्या व अन्य प्रलंबित मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी यांनी आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.

या संबंधीची महिती मा. नारायण राणे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर दिली. त्यांनी नमूद केल्याप्रमाे खालिल मुद्यावर चर्चा झाली व मार्ग निघाला.

१. गणेशोत्सव तिकिट बुकिंग बाबत आरोपांसंबंधात तसेच अधिकच्या हॉलीडे स्पशेल ट्रेन संबंधात योग्य तो मार्ग काढण्याबाबत मा. रेल्वे मंत्र्यांनी आश्वस्त केले.

२. तुतारी एक्सप्रेस सिंधुदुर्ग जिल्हयातील नादंगाव स्टेशनवर थांबविण्यात येईल असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.

३. कोकण रेल्वे वरील वंदे भारत सेवेला कणकवली येथे धांवा देण्याचा निर्णय झाला.

४. कोकणच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मिनी टॉय ट्रेन बाबत सकारात्मक चर्चा झाली.

५. पडवे येथील रेल्वेचा अंडरपास बांधण्याच्या प्रस्तावास रेल्वे मंत्र्यांनी मान्यता दिली.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment