पोलादपूर तालुक्यात शिवसैनिकांनी “लोकप्रिय आमदार भरत शेठ गोगावले” यांच्या वाढदिवसानिमित्त गुळाची तुला,
संपूर्ण तालुक्यात “पंधरा हजार किलो” गुळाचे घरोघरी केले वाटप-
पोलादपूर शिवसेनेच्यावतीने वाढदिवसाचे औचित्य साधून गुळाची तुला करण्यात आली, यावेळी पोलादपूर तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने संपूर्ण तालुक्यात प्रत्येक घरोघरी गुळ वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी पोलादपूर तालुक्यात लोहार माळ आणि कापडे या ठिकाणी वाढदिवसाचे औचित्य साधून गुळाचे वाटप आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे माजी जिल्हा परिषद सदस्य सौ सुषमा गोगावले, तालुकाप्रमुख उपतालुकाप्रमुख विभाग प्रमुख पंचायत समिती सदस्य शहर प्रमुख तालुक्यातील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच तालुक्यातील शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
तसेच या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या आणि माझ्या वाढदिवसानिमित्त केक कापून कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा केला.
संबंधित छायाचित्रे :