चोपड्याचे आमदार लताताई सोनवणे यांच्या गाडीला वाळूच्या डंपरची जोरदार धडक.

Share news

जिल्ह्यात होत असलेल्या अवैध रेतीची वाहतूक अनेकांच्या जीवावर उठलेलली आहे.त्यातच चोपड्याचे आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या गाडीला भरधाव रेतीचे डंपरने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे.सुदैवाने आमदार लताताई सोनवणे यांच्यासह माजी आमदार चंद्रकांत सोनवणे,व त्यांचे सुरक्षारक्षक यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय जोरात सुरू आहे.वाळूने भरलेले ट्रॅक्टर,डंपर हे भरधाव वेगाने आपली वाहाने चालवत असतात व अवैध रेतीची वाहतूक करत असतात.आजपर्यन्त वाळु वाहातुक करणाऱ्या ट्रॅक्टर,ढंपर ने शेकडो निष्पाप नागरीकाचा जिव घेतला आहे.त्यातच आता नुकताच मिळालेल्या माहितीनुसार चोपड्याचे आमदार सौलताताई सोनवणे,व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे हे चोपड्याहुन जळगाव कडे येत असताना करंज गावाजवळ रेतीच्या रिकाम्या भरधाव ढंपरणे त्यांच्या MH19 BU 999 या वाहनाला जोरदार धडक दिली.सुदैवाने या अपघातात मोठी हानी झाली नसून आमदार लताताई सोनवणे व चंद्रकांत सोनवणे यांच्यासह सुरक्षारक्षक हे किरकोळ जखमी झाले आहे.परंतु वाहानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247

संबंधित व्हिडिओ :

Leave a Comment