कळमना गावात स्वतंत्र युवाशक्ती संस्था सार्वजनिक वाचनालयात रमाई भिमराव आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी

Share news

कळमन या गावातील स्वतंत्र युवाशक्ती संस्था सार्वजनिक वाचनालय मध्ये रमाई भिमराव आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य मिराबाई मोहतकर अंगणवाडी सेविका रेखा गायकवाड रीना ताई गायकवाड अंजली कोल्हे व विद्यार्थी मित्र उपस्थित होते.

रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या जीवनात खूप कष्ट केलं होतं. त्याचप्रमाणे दु:ख देखील उपभोगल होतं.
जीवनात केलेल्या अपार कष्टांमुळे त्यांचे शरिर पोखरून गेलं होतं.
त्यांना आजार बळावला होता. ई.स. १९३५ साली त्यांचा आजार वाढतच गेला आणि मे १९३५ साली तर त्यांचा आजार खूपच विकोपाला गेल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नामांकित डॉक्टरांना पाचारण केले होते.त्यांच्या तब्येतीत कुठलीच सुधारणा होत नव्हती.बाबासाहेब त्यांच्या जवळ बसून राहत असतं.
असेच काही दिवस सुरु असतांना २७ मे १९३५ साली रमाबाई आंबेडकर यांची आजारपणामुळे प्राणज्योत मावळली.
खरच, यातून अस म्हणता येईल की रमाबाई यांनी आपल्या जीवनामध्ये केलेला संघर्ष आणि त्यांनी दिलेलं बलिदान खूप मोठ आहे.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment