शासकीय आश्रम शाळा खुटलच्या( बा.) विद्यार्थ्यांची १००% निकाल लावत HSC परीक्षेत बाजी

Share news

शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा खूटल ( बा.) येथील बारावी कला व विज्ञान शाखेचा निकाल 2023 चा शंभर टक्के लागला आहे त्यामुळे मुरबाड तालुक्यातून आश्रम शाळेतील शिक्षक वर्ग कर्मचारी व शाळेचे मुख्याध्यापक के .आर. पाटील यांच्या वर अभिनंद ना वर्षाव होत आहे
मुरबाड तालुक्यातील अतिशय दुर्गम भागामध्ये असणारी खुटल ( बा) येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळविले आहे .त्या मध्ये कनिष्ठ लिपिक एन के लिहे, अधीक्षक धीरज पाटील, प्राध्यापक टी आय पाटील, प्राध्यापक आर एस जाधव, प्राध्यापक जे एन खाकर, प्राध्यापक केटी भला, प्राध्यापक एम एम वाघ, एनटी हरड मॅडम, एस के मधे मॅडम, अधीक्षिका रंजना बहीराम मॅडम,या सर्व या सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

विज्ञान विभागातून अनिल बाबल्या नडगे ह्या विद्यार्थ्याला 65.%/ टक्के गुण मिळाले आहेत तसेच हर्षदा बारकू शेळकंदे 63.17%, आरती रघुनाथ उघडा 61.33%, चेतना संतोष भगत 59.17%, संध्या कांताराम भला , 57.33%
आणि कला विभागातून विकास पांडुरंग वाघ ह्या विद्यार्थ्याला 66.67%गुण मिळाले आहेत, दीपक भास्कर तेलम 65.33%, कोमल बाळू भला,64.83%, विमल चंद्रकांत हिदोला64.50% , छगन पांडुरंग सोंगाल,63.33% तसेच अन्य सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले त्याचे सर्वाचे शाळेचे मुख्याध्यापक के. आर. पाटील सर यांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment