चिंदर गावचे सुपुत्र 80 हून अधिक लोकवाद्यं वाजवण्याची कला अंगीकृत असलेले मधुर पडवळ यांचा मायभूमीत सत्कार.

Share news

देशविदेशातील 80 हून अधिक लोकवाद्यं वाजवणारा जादुगर

जगभरातील ऐंशी पेक्षा जास्त प्रकारची वाद्ये वाजवण्याची कला अवगत असणारे चिंदर गावचेमूळ रहिवासी मुंबई निवासी चिंदार गावचे रत्न श्री. मधुर सुहास पडवळ यांना त्यांच्या मातृभुमीत चिंदर नागोचीवाडी येथे धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी सन्मानित करण्यात आले.

मधुर पडवळ हे इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनसाठी भारताचे प्रतिनिधित्व करतात. आजवर मधुर यांनी एकवीस राज्यांतील दुर्गम भागात प्रवास करून तेथील ऐशी (80) हून अधिक लोकवाद्यांचे शिक्षण घेतले आहे. अठरा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना हे यश मिळाले आहे. यासाठी त्यांनी अपार मेहनत केली आहे. सखोल अभ्यास ही केला आहे.

विविध चित्रपट, नाटक तसेच जाहिराती साठी देखील त्यांनी संगीत दिले आहे. एम टिव्ही च्या देसी रॉक अंतर्गत पहिल्या दहा गिटारिस्ट मध्ये त्यांची निवड झाली आहे.

मधुर यांनी रावणहत्ता, तुंबा, पेपा, अशी अनोखी नावे असलेली ताल वाद्य, तंतू वाद्ये आपल्याला ताल धरायला लावतात.

मधुर पडवळ यांनी सुरुवातीला गिटार चे प्रशिक्षण अय्यर सर यांच्या कडे घेतले. तिथून सुरू झालेला हा संगीताचा प्रवास फॉक्सवेगन प्रोजेक्ट वर पोहोचला आहे.

गुरू शिष्य परंपरा या विषयावर भाष्य करताना मधुर स्वतःला अय्यर सरांसारखे गुरू लाभले म्हणून भाग्यवान समजतात.
मधुर पडवळ हे भारतातील अव्वल स्थानावर असलेला लोकवाद्य कलाकार आहे. भारतीय लोकवाद्यांचा अभ्यास करून त्यानी लोककला जपण्याचे आणि जीवित ठेवण्याचे कार्य ते करीत आहे. सर्वसामान्य कुटुंबातून असून देखिल मधुर पडवळ यांनी मिळविलेले यश हे आजच्या पिढीतील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

सत्कारा वेळी बोलताना मधुर म्हणाले की माझा मातृभूमीत होणारा सत्कार मला नेहमी प्रेरणा, बळ देईल. आपल्या आई-वडीलांनमुळे आपण हे यश मिळवू शकलो असाही उल्लेख मधुर त्यांनी केला.
यावेळी भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वै, ग्रामपंचायत सदस्य दुर्वा पडवळ, महेंद्र मांजरेकर, दादु पडवळ, डाँ. महेश पडवळ, योगेश पडवळ, यदुनाथ पडवळ, दत्तात्रय पडवळ, सतिश नलावडे व नागोचीवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247

Leave a Comment