मुरबाड कराची मागणी आमदार किसन कथोरे यांना मंत्री करा

Share news

ठाणे/मुरबाड (शंकर करडे) मुरबाड तालुक्याला इतिहास हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ ,नाना शंकर शेठ ,वीर हुतात्मा भाई कोतवाल ,हिराजी गोमाजी पाटील ,नाणे घाट ,माळशेज घाट ,व महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री शांताराम भाऊ घोलप हे त्या वेळी वकील होते ,वकिली व्यवसाय पासून लोकांची सेवा ,असा मुरबाड तालुक्याचा इतिहास असून ,आता पर्यंत मुरबाड विधानसभा मतदार संघ मंत्री पदापासून कोसो दूर आहे, आता.पर्यंत सरकारे खूप आली.परंतु मुरबाड तालुका मतदार.संघावर अन्यायच होत आहे.या मतदार संघातून आतापर्यंत निवडून गेलेले आमदार ,पहिले तेलम, शांताराम भाऊ घोलप ,गोटीराम भाऊ पवार ,दिगंबर विशे (सर) व आता विद्यमान आमदार किसन कथोरे ,महाराष्ट्रातील सर्वात विकास निधी व विकास कामे.करणारे वेक्तिमत्व म्हणजे किसन कथोरे ,मात्र यांना मंत्री पदापासून दूर ठेवण्यात येत आहे, या.मुळे सरकार वर मुरबाड मतदार संघातील मतदार नाराज.आहेत ,चातका पक्ष्याप्रमाणे मुरबाडकर कथोरे मंत्री.होतील या अपेक्षेने वाट पाहत आहेत ,मुरबाड मतदार.संघावर हा अन्याय होत आहे .

आता होणाऱ्या मंत्री मंडळात होणाऱ्या फेर बदलात आमदार कथोरे याची वर्णी लागते की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे ,२३/२४ मे अखेरीस होणाऱ्या मंत्री मंडळ विस्तारात आमदार किसन कथोरे यांना मंत्री पद.मिळणे अपेक्षित आहे अशी मुरबाड मतदार.संघात चर्चा सुरु आहे ,या मंत्री बदलाच्या विस्तारात मुरबाडच्या विकासाचे वादळ मंत्री होतीलच ,मुरबाड करांच्या अश्या पल्लवीत होणार हे मात्र नक्की.मुरबाड करांना लाल दिवा दया .शिंदे ,फडणवीस सरकारने ही बाब लक्ष्यात घ्यावी , महाराष्ट्रातील ३ नंबर मताधिक्याने निवडून आलेले आमदार किसन कथोरे विधानसभा अध्येक्ष नाही केले परंतु आता मंत्री करा अशी मुरबाड तालुक्यातील मतदारांची मागणी जोर धरू लागली.आहे माजी महसूल मंत्री कैलासवासी शांताराम घोलप यांच्यानंतर मुरबाडच्या विकासाचे वादळ कार्यसम्राट आमदार किसन कथोरे हे मंत्री होतीलच अशी अपेक्षा मुरबाड मधील भाजपाचे नितीन मोहपेसर, रामभाऊ दुधाळे, सुरेश बागर सर, दिलीप देशमुख, अतुल देशमुख, मनोज देसले, भास्करशेठ वडवले, व तालुक्यातील सर्व सामान्य जनता करत आहे

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment