धसई ग्रामपंचायतीचा अजब कारभार घरकुल लाभार्थ्याला नाकारली घरपट्टी.

Share news

मुरबाड तालुक्याचे भाग्य विधाते असणारे ,माजी महसूल मंत्री शांताराम भाऊ घोलप यांचे गाव धसई असून त्या ग्रामपंचायत मध्ये सर्वसमामान्य घरकुल लाभार्थी संतोष कचरू चव्हाण याने ग्रामपंचायतीकडे दी.५/४/२०२३ रोजी अर्ज केला होता ,आणि विद्यमान सदस्य भगवान शिवाजी जाधव याने दी.२७/४/२०२३ रोजी केलेला अर्ज परंतु जो सर्वसामान्य घरकुल लाभार्थी आहे त्यास ग्रामपंचायतीने ,ग्रामपंचायत सदस्य.भगवान शिवाजी जाधव याच्या सांगण्यावरून म्हणजे ,संतोष चव्हाण हा फॉरेस्ट मध्ये राहतो म्हणून तक्रार दिली त्या वरून घरपट्टी नाकारली ,परंतु महाराष्ट्र सरकारने त्याला घर नाही म्हणून रमाई आवास योजना या मधून घरकुल दिले शासना चे पैसे खर्च झाले ,घर बांधले त्या वेळी ग्रामपंचायत झोपली होती काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ज्यास.जागा नाही त्याला घर बांधण्यासाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी असा.ग्रामपंचायत कायदा म्हणतो,मात्र येथे उलटे आहे ,जो विद्यमान सदस्य.आहे त्याला कुठलीही ग्रामसभा नाही मासिक सभा नाही ,चर्चा नाही त्या सदस्याला घरपट्टी दिली जाते ,व सर्वसामान्य माणसावर या धसई ग्रामपंचायत मध्ये अन्याय होत आहे ,धसई मधील ग्रामविकास.अधीकारी लता बांगर व लिपिक शहाजी वाघ ,प्रदीप घोलप यांची प्रशासकीय भूमिका जनहितार्थ असून मात्र चांगल्या कामापासून वंचित केला जात आहे.धसई ग्रामपंचायत मधील.सरपंच ,व सदस्य यांची मनमानी कारभार चालू आहे, यांच्या कडून सर्वसामान्य जनतेची पिलवणूक होत आहे ,अश्या ग्रामपंचायतीची सखोल चौकशी करा अशी मागणी जोर धरत आहे. भगवान जाधव यांचे कोणतेहि कागद नसताना त्यांना घरपट्टी दिली जाते हा बेजबाबदार पणामुळे सर्वसामान्य जनता वेठीस धरले जात आहे. मा .गटविकास अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी येथील नागरिकांची मागणी जोर धारित आहे.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment