WCPA यांच्या वतीने श्रीरामपूर येते राष्ट्रीय स्तरावरील बाप या विषयावरील काव्य संमेलनाचे आयोजन.

Share news

वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन अर्थात जागतिक संविधान व संसद संघ (डब्ल्यूसीपीए) यांच्या वतीने श्रीरामपूर येथील शासकीय व्हि आय पी गेस्ट हाऊस सभागृहात राष्ट्रीय स्तरावरील बाप या विषयावरील काव्य संमेलन घेण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक माजी पोलिस अधिकारी सुभाष सोनवणे यांनी वर्ल्ड पार्लमेंटच्या साहित्य क्षेत्रातील अनेक सुत्य उपक्रमांचे कौतुक केले.

या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख अतिथी श्री. सुनिल पाटील (वरिष्ठ पत्रकार व धुळे जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष), श्री. रणजीत श्रीगोड (महाराष्ट्र प्रवेश प्रवासी महासंघ अध्यक्ष), श्री. निवृत्ती बागुल (संपादक -दै. बालेकिल्ला मालेगांव), श्री. दिपक म्हस्के ( सचिव, महाराष्ट्र सेना फिल्म संघ), सौ. जयश्री सोनवणे ( सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार), मा .लोककवी सिताराम नरके (राष्ट्रपती पोलिस पदक मानकरी), मा. रानकवी जगदीप वनशिव ( ज्येष्ठ कवी लेखक निवेदक) व श्री. सुरेश कांबळे ( आला बाबूराव -या लोकप्रिय गीताचे गायक व गायक) यांनीही प्रबोधनात्मक व वर्ल्ड पार्लमेंटच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.

वर्ल्ड पार्लमेंटच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी संस्थेच्या कार्याचा व भविष्यातील नियोजनाचा थोडक्यात आढावा आपल्या प्रास्ताविकात करताना सर्व मान्यवरांचे साहित्यिकांचे स्वागत केले .

वर्ल्ड पार्लमेंटच्या वतीने नुकतीच एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आली त्यातील पाच विजेते
रूपचंद शिदोरे, शुभम मोहिते, दर्शन जोशी, .योगिराज कोचाडे, मेजर रामदास शेळके पोलीस अधिकारी यांचा शाल सन्मानपत्र स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देवून विशेष सन्मान करण्यात. तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्रीमती. खुर्शादबी शेख, साहित्य व कृषी (सोलापूर), श्री.व्यंकटराव भोसले, मुतखडा तज्ञ (इंदापूर, पुणे), श्री. रूपचंद शिदोरे सर्वोत्कृष्ठ रेल्वे मोटरमन व साहित्य (अहमदनगर), श्री.अशोक पवार, साहित्य (कडेगांव, सांगली), श्री.वजीर शेख पत्रकारीता व सामाजिक कार्य (पाथर्डी), श्री. बाळासाहेब कोठुळे पाथर्डी, अहमदनगर), श्री. निवृत्ती बागुल, पत्रकारीता ( संपादक -दै. बालेकिल्ला मालेगांव). प्रा. डॉ. वंदना केंजळे, शिक्षण, साहित्य व योगा (पुणे), यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड व मेंबरशीप देऊन सन्मानीत करण्यात आले. तर मनजितसिंग बत्रा, श्रीरामपूर यांना सदस्यत्व प्रदान करण्यात आले.
बाप या विषयावर कविसंमेलनात रूपचंद शिदोरे, शुभम मोहिते, दर्शन जोशी, योगिराज कोचाडे, मेजर श्रामदास शेळके राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी लोककवी सिताराम नरके, ग्रामीणकवी आनंदा साळवे, ज्येष्ठकवी भास्करराव लगड,निवृत्ती बागुल, आत्माराम शेवाळे, बाळासाहेब कोठुळे, बाळासाहेब ठोंबरे, सी के भोसले, अशोक पवार शिवणीकर, बाळासाहेब मुंतोडे सुदर्शना महाजन, आश्विनी योगेश पाटील, आश्विनी धुमाळ,प्रियंका वायकोस मंगल गायकवाड, प्रा.डॉ. वंदना केंजळे, बालकवी निखिल, रानकवी जगदीप वनशिव मुकुंद तांबे अशा नामवंत कवीनी बाप या विषयावरील हृदयद्रावक कविता सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांतून आसवांना धारा मनमुरादपणे वाहत होत्या मनातले भाव व्यक्त करून मनमोकळीक करत कविते भक्त असे व्यक्त झाले.

सदर कार्यक्रमाचे उदघाटन भारतीय संस्कृतीत आयुर्वेदात महत्वाचे स्थान असलेल्या तुळशीला जलार्पण व स्व. बाबुलालजी विघावे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. दत्ता विघावे यांचे पिताश्री स्व. बाबुलालजी विघावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सदर काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे खास वैशिष्टये म्हणजे सर्व पुरस्कार विजेते व कवींना एका विशेष सिंहासनावर बसवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. सदर उपक्रमाचे फेसबुकवरून जगभर थेट प्रक्षेपण करण्यात आले. पुरस्कार सोहळ्याचे निवेदक अनंत द्रविड यांनी महाराष्ट्रातील नामवंत निवेदक रानकवी जगदीप वनशिव यांनी काव्यसंमेलनाचे बहारदार रसाळ ओघावत्या शैलीत मधुर वाणीने न सूत्रसंचलन केले. डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे सहसचिव श्री. ऋषिकेश विघावे यांनी सर्वांचे आभार मानले.
अशा प्रकारे श्रीरामपूर येथे कार्यक्रम संपन्न झाला

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment