मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार. ठेकेदाराचे बिल पास झाले तरी रस्ता अपूर्ण.

Share news

मुरबाड मधील देहरी ,तुलई रस्ता डांबरीकरणचे काम रुपये २.५ कोटी साठी मंजूर करण्यात आले. त्याचे उदघाटन मा .आमदार यांच्या हस्ते करण्यात आले ,मात्र संबंधित ठेकेदाराला बिल पास करूनही काम अजून अपुरच आहे अशी तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत.

देहरी ,कळंबे फाट्या पासून कळंबे ,तुलई फाट्या पर्यंत रस्ता करण्यात आला आहे ,परंतु तुलई पासून मुरबाड करिता जाण्यासाठी रस्ता आहे त्याच अवस्तेत ठेवला आहे ,तुलई ,कळंबे व. परिसरातील नागिकांचे या रस्त्यावरून प्रवास करताना हाल होत आहे.

या संबंधीची तक्रार ,दिनांक ४ मे रोजी बातमी लावुनही अभियंता व जे.ई.यांनी कोणतीच कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये संताप वेक्त होत आहे ,पावसास मोजून १५ दिवस उरले असता ,बिल काढूनही तुलई पासून विढे पर्यंत काम केले जाईल की नाही अशी शंका निर्माण होत् आहेत अधिकारी ठेकेदारांच्या ईशाऱ्यावर चालतात असा नागरिक आरोप करत आहेत.

या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई ची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

तसेच पाहिजे व तुलई पासून विढे पर्यत रस्ता डांबरीकरण झाले नाही तर येत्या ८ दिवसात ,तीन हात नाका ,१३० फुट तिरंगा झेंडा येथे तुलई येथील गावाकरी आमरण उपोषण करतील अशी तुलई येथील गावकर्यानी माहिति व लेखी तक्रार दिली आहे ,रस्ता जो पर्यत चालू होत व काम न करता बिल दिले आहे त्या वर ठेकेदारावर कारवाई होत नाही तो पर्यंत उपोषण स्तगित् होणार नाही अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment