युवा आर्टिस्ट रत्नागिरी कोकणरत्न शैलेश कांबळे याचा राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्काराने गौरव !

Share news

संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल शैलेश अरूण कांबळे ( मुळगाव रानवी) याला लखनऊ उत्तरप्रदेशच्या वर्थी वेलनेस फाउंडेशन संस्थेतर्फे राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार नुकताच ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात आला.

गुहागर तालुक्यातील रानवीतील शैलेश कांबळेने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, रानवी तर माध्यमिक शिक्षण श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर तसेच, दुर्गाबाई हरी वैद्य माध्यमिक विद्यालय, अंजनवेल मधुन पूर्ण केले. अकरावी बारावी खरे ढेरे महाविद्यालय, गुहागर येथे केल्यानंतर डीबीजे महाविद्यालयात चिपळूण येथून वाणिज्य शाखेची पदवी घेतली.
लहानपणापासून त्याला संगीताची आवड होती.अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट गायकांसोबत शैलेश यांनी विविध प्रकारची वाद्ये वाजवून साथसंगत केली आहे. काही चित्रपटाना संगीत देणाऱ्या वाद्यवृंदामध्ये सहभागी होण्याची संधीही त्याला मिळाली. इव्हेंट,रिॲलिटी शो, म्युझिक अल्बम, स्टुडिओ रेकॉर्डिंग, म्युझिक चॅनेल अशा विविध माध्यमांमध्ये विविध ताल वाद्यांचे वादन त्यांने केले आहे.
या कामांची, शैलेशच्या जिद्दीची दखल लखनऊ उत्तरप्रदेश राज्याच्या वर्थी वेलनेस फाउंडेशनच्या फाऊंडर मानसी बाजपेयी को.फाऊंडर सौम्या बाजपेयी यांनी घेतली. संगीत विभागातील राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार 2023 या पुरस्कारासाठी शैलेश कांबळेची निवड केली. सध्या शैलेश हा मुंबई दादर येथे कार्यरत असून संगीत क्षेत्रात काम करत आहे

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment