धुळे,अनीस खाटीक:
शहरातील संपूर्ण रस्ते गटार व मूलभूत सोयी सुविधांसाठी आ.फारुख शाह हे प्रयत्न करीत असून त्याला आज पर्यंत यश आलेले आहे.तसेच शहराच्या विकासाबरोबर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी शहरात एकूण चार ठिकाणी अभ्यासिका होणार आहे शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना तोंड देण्यासाठी व अभ्यास करून स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी हे अभ्यासिका महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. धुळे शहरात एकूण चार ठिकाणी अभ्यासिका होणार आहेत त्यात विटाभट्टी देवपूर साक्री रोड कबीर गंज तसेच जिरेकर नगर येथे अभ्यासिका होणार आहे दिनांक पाच ऑक्टोबर रोजी दूध डेरी रोड जीरेेकरनगर येथे नगरसेवक परवीन अग्रवाल यांच्या घराजवळ अभ्यासिकाच्या 25 लाख रुपये कामाच्या शुभारंभ आ.फारुख शाहयांच्या हस्ते संपन्न झाला यावेळीस लक्ष्मीबाई गायकवाड,चंद्रकला पाटील,कल्पना देवरे,संदीप जाधव,धडकू पाटील,अमोल जीरेकर,डॉ.शराफत अली,प्यारेलाल पिंजारी,आसिफ शाह, अफसर शाह इंजिनियर,रियाज शाह व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.