श्रीवर्धन मध्ये ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चा कार्यक्रमाला सुरुवात

Share news

प्रतिनिधी/संदीप लाड

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या होऊ द्या चर्चा करुया बोलघेवड्या सरकारचा भांडाफोड या कार्यक्रमाला श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला पंचायत समिती गणातील वडघर सतीची वाडी येथे सुरुवात करण्यात आली

यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार तुकाराम सुर्वे,तालुका प्रमुख अविनाश कोलंबेकर,विभाग प्रमुख

संदीप रिकामे, वडघर सरपंच प्रकाश जाधव,जेष्ठ शिवसैनिक महादेव जाधव युवा कार्यकर्ते सागर जाधव गावचे अध्यक्ष रघुनाथ शेडगे यांच्यासह गावातील असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते

यावेळी तालुकाप्रमुख अविनाश कोलंबेकर यांनी 2014 पासून ते आजपर्यंत मोदी सरकारने महागाईने सर्व सामान्य जनतेचा कणा मोडला आहे आज प्रत्येक गोष्टीत महागाई

वाढलेली आहे बेरोजगारी आहे मोदी सरकारच्या सर्व बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड केला

कोरोना महामारीत

मुख्यमंत्री असताना उद्धव साहेब यांनी सर्व सामान्य जनतेला स्वतच्या कुटुंबाप्रमाणे जपले आहे सेवा केली आहे आपणाला माहीत आहे

येणाऱ्या काळात आपले सरकार आणुया आपण सर्वजण पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करून शिवसेना पक्ष मजबूत करुया असे सांगितले

यावेळी वडघर सतीच्या वाडीतील ग्रामस्थांनी एकमुखाने संपूर्ण गाव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या मागे कायम राहणार असल्याचे उपस्थित पदाधिकारी यांना सांगितले