महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल विदर्भ प्रतिनिधी चेतन हिंगे.
अमरावती जिल्ह्यातील बहुतांश भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासनाने निवडणुका च्यां तोंडावर सर्व सरकारी उपचार मोफत तर केलें परंतू प्रत्येक ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्या नंतर औषध लिहून देतात. परंतू औषधं वितरण च्या ठिकाणीं गेल्या नंतर तिथे आमच्या कडे हे औषध ऊपलब्ध नाही हे तुम्हाला बाहेरून आणावे लागेल असे सांगण्यात येते… त्यात संपूर्ण परीसरात थायराईट,, डेंग्यू च्या साथीच्या आजारांची साथ सुरु आहे… आनी आताच नांदेड. संभाजीनगर, इथे सरकारी दवाखान्यात उपचारा अभावी कित्तेक रुग्ण दगावल्याची घटना घडल्या आहेत…
कित्तेक ठिकाणीं तर एकाच कर्मचाऱ्यावर औषध वितरण,, रुग्णांना सलाईन लावणे अश्या पूर्ण दवाखान्याची जबाबदारी असते असे दिसून आले..
अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरात लवकर करण्यात याव्या आशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातून होत आहे.
एकीकडे सर्वांना मोफत आरोग्यतपासणी करण्याची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली परंतू त्या मागे कोणतेच नियोजन करण्यात आले नाही असे दिसून येते…
तरी शासनाने लोकप्रियता वाढवण्या साठी केलेली घोषणा प्रत्येक्षात उतरवण्या साठी प्रत्येक ठिकाणीं कर्मचारी व औषध पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.